वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते श्री च्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी माननीय कुुुुुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी सर्वांना गणेशोत्सवा निमित्त शुभेच्छा दिल्या.
Wednesday, August 31, 2022
Thursday, August 18, 2022
मा. श्री. दादाजी लाड यांची विद्यापीठास भेट
भारतीय किसान संघ संघटन मंत्री, महाराष्ट्र राज्य मा. श्री. दादाजी लाड यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत पाणी व्यवस्थापन प्रकल्पास दिनांक १८ ऑगस्ट रोजी भेट देऊन कापुस लागवड प्रयोगाच्या प्रक्षेत्राची पाहणी केली.यावेळी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि आणि विद्यापीठ शास्त्रज्ञ.
Bharatiya Kisan Sangh, Sanghatan Mantri,Maharashtra State Shri. Dadaji
Lad's visit at Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani Water
Management Project.
Wednesday, August 17, 2022
तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रास माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांची सदिच्छा भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रास दिनांक १३ ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट देऊन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. माननीय कुलगुरू यांचे कार्यक्रम समन्वयक श्री. लालासाहेब देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी केंद्रातील शास्त्रज्ञ वर्षा मरवाळीकर, डॉ विजयकुमार जाधव, गणेश मंडलिक, अपेक्षा कसबे, डॉ. श्रीकृष्ण झगडे, श्री.सखाराम मस्के, डॉ नकुल हरवाडीकर, श्री. शिवराज रूपनर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी बांधवापर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हयातील कृषि विज्ञान केंद्राची आहे. उस्मानाबाद जिल्हयातील जैवविविधता, तापमान, पर्जन्यमान, शेतक-यांच्या असलेल्या विविध समस्या लक्षात घेऊन कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी कार्य करावे. शास्त्रज्ञांनी जिल्हयातील शेतक-यांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून राज्यातील व राज्याबाहेरील शासकीय, निमशासकीय संस्थांकडे निरनिराळे प्रकल्प अहवाल सादर करावेत. सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नाने विस्तार कार्याची व्याप्ती वाढवुन जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचवु, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सौजन्य: डॉ विजयकुमार जाधव, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापुर
Tuesday, August 16, 2022
मालेगाव (अर्धापुर) येथे शेतकरी मेळावा संपन्न
अर्धापुर (जिल्हा नांदेड) तालुक्यातील मालेगाव येथील आत्मनिर्भर किसान प्रोडूसर कंपनी लिमिटेड व आयडियल ॲग्री सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १७ ऑगस्ट रोजी मालेगाव येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटक वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे होते तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री आर बी चलवदे, डेव्हलपमेंट मॅनेजर श्री वैभव कुमार जाधव, नांदेड जि.प. चे कृषि विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशेटे, आयडियल ॲग्री सर्च लि. चे झोनल मॅनेजर श्री बी. सी.बकाल, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी श्री अनिल शिरफुले, श्री संतोष गव्हाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी देवो भव: म्हणजेच शेतकरी हा समाजासाठी
देवता समान असुन शेतकरी कल्याणासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता आहे.
मेळाव्यात हळद व केळी या विषयावर तज्ञांनी
मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास मालेगाव
परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी उपस्थिती होती. कार्यक्रम
यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री दत्ता पाटील
धामदरी कर, गजानन
कोटकर , श्री मारोती देमे, सतीश आरसुळे यांनी परिश्रम घेतले.