Thursday, August 31, 2023

Prof. (Dr.) Indra Mani addressed the 12th Brainstorming session of IAUA organised at SKUAST-K, Srinagar

The 12th Brainstorming Session of Indian Agricultural Universities Association (IAUA) on ’Redefining Agricultural Education to Leadership, Entrepreneurship, Employment and Discovery (LEED)’ was organised on 24-25 August, 2023 at Sher-e-Kashmir University of Agricultural Science and Technology of Kashmir, Srinagar. Prof. (Dr.) Indra Mani, Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani invited as a keynote speaker. He delivered a keynote address on ‘'Revolutionizing Farming Practices in India through Innovations in Mechanization, Drones and Robotics'  


Prof. (Dr.) Indra Mani highlighted the transformative potential of technological innovations like  drones, robotics and automation. These advancements promise to revolutionize farming practices, improve resource efficiency, and drive sustainability. The integration of digital technologies in agriculture, such as sensors, drones, smart irrigation, and robotics, enables precision farming, plant health management, and yield optimization. He emphasized the importance of technology adoption to enhance productivity, reduce costs, and ensure sustainable practices. In line with global trends, India's agricultural sector is embracing digital agriculture. He said that the future of agriculture will be led by knowledge, technology innovation, and skill. Mechanization and automation have already proven to be significant inventions, enhancing productivity and reducing labor-intensive tasks. These advancements are essential for addressing food security, climate change, and poverty challenges.

He also highlighted the initiatives at Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani, where the Centre of Excellence for Digital Farming Solutions has been established under NAHEP. This center focuses on advancing agricultural sector by integrating technologies like agri-bots, agri-drones, and AGVs.

His keynote address concluded by underscoring the benefits and challenges of technology adoption in Indian agriculture. While innovation promises enhanced productivity and sustainability, addressing initial costs, technological literacy, and maintenance issues is crucial for successful implementation.



वनामकृवि विकसित तीन बीटी सरळ वाणास राष्‍ट्रीय वाण निवड समितीव्‍दारे लागवडीसाठी शिफारस

कापुस पिकांतील बीटी सरळ वाण विकसित करणारे राज्‍यातील ठरले पहिलेच कृषि विद्यापीठ

शेतकरी बांधवाचा बियाण्‍यावरील खर्चात होणार बचत  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची केंद्रीय वाण निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीद्वारे नवी दिल्ली येथे नुकत्‍याच झालेल्या बैठकीत मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश) विभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे.

कुलगुरू मा. प्रा. डॉ. इन्‍द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कापूस विशेषज्ञ डॉ. के.एस. बेग व वाण विकसित करण्‍याकरीता योगदान देणा-या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले कीपरभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्‍या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्‍यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्‍यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्‍पादनात सातत्‍य देणारे हे वाण आहेत. महाराष्‍ट्राबाहेरही गुजरात व मध्‍यप्रदेश मध्‍ये या वाणाची लागवडीकरिता मान्‍यता दिली आहे. कापुस पिकांतील बीटी सरळ वाण विकसित करणारे राज्‍यातील पहिलेच कृषि विद्यापीठ ठरले असुन ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.विद्यापीठ शास्त्रज्ञांच्‍या अथक परिश्रमामुळेच हे शक्‍य झाले.

सार्वजनिक क्षेत्रामध्ये बीटी कापूस सरळ वाण प्रसारीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले असुन बीटी कापूस लागवडीस सुरुवात झाल्यापासून खासगी कंपनीव्‍दारे कापुसाच्‍या संकरीत वाण निर्मितीवरच भर होतो. कोणत्याही खासगी कंपनीद्वारे कापूस पीकाचे बीटी सरळ वाणाचे बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आले नाही. सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पादीत कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी नवीन बियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्‍यकता पडणार नाही आणि पर्यायाने बियाण्यावरील खर्च कमी होईल. प्रस्तुत वाण हे सरळ वाण असल्यामुळे त्यांना रासायनिक खतांची गरज संकरित वाण पेक्षा कमी लागते. विद्यापीठ विकसित ही वाण रसशोषण करणार्‍या किडींना सहनशील असल्यामुळे कीड संरक्षणासाठी होणार्‍या खर्चामध्ये कपात करता येणार आहे. 

ही बीटी सरळ वाण कापूस उत्पादनासाठी तुल्यबळ वाणांपेक्षा सरस असून कोरडवाहू लागवडीमध्ये मध्य भारतामधील विविध केंद्रांवर या वाणांच्या उत्पादनामध्ये सातत्य आढळून आले आहे. हे वाण रसशोषक किडी आणि जीवाणूजन्य करपा व पानावरील ठिपके या रोगांकरिता सहनशील आढळून आले. या बीटी सरळ वाणाचा रुईचा उतारा ३५ ते ३७ टक्के असून यांचे धाग्याची लांबी मध्यम, मजबूती व तलमपणा सरस आहे. ही तिन्ही बीटी सरळ वाणांची मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांकरिता शिफारस करण्यात आली आहेत. यापैकी एनएच १९०१ बीटी या वाणाचा रुईचा उतारा ३७ टक्के असून सघन कापूस लागवडीस अनुरूप आहे.

विद्यापीठ विकसित देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तमिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला असुन या वाणाच्या धाग्याची लांबी अधिक व मजबूती सरस आहे.

 नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राचे संशोधन कार्य

यावर्षी राहुरी येथे पार पडलेल्‍या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती २०२३ द्वारे कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत अमेरिकन बिगर बीटी सरळ वाण एनएच ६७७ (NH-677) हा महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडीसाठी प्रसारीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा वाण रसशोषण करणार्‍या कीडीस सहनशील असून याच्या रुईचा उतारा ३६-३७ टक्के आहे. हा वाण सेंद्रीय लागवडीस उपयुक्त आहे.

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसीत एनएचएच २५० व एनएचएच ७१५ या अमेरिकन संकरीत वाणांचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला (महाबीज) यांच्या सहकार्याने बोलगार्ड २ स्वरूपात रूपांतरीत करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन कपाशीचे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी व क्राय २ एबी जनुक) तंत्रज्ञानयुक्त स्वरूपातील सरळ आणि संकरीत वाणांची पैदास करण्याचे कार्य चालू असून मोठ्या आकाराची बोंडे, सघन लागवडीस उपयुक्त आणि कमी कालावधीचे वाण कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे विकसीत करण्यात येत आहेत. 

 

Tuesday, August 29, 2023

Organization of Inter College Basketball Tournament

On the eve of National Sport Day, VNMKV Parbhani has organized Inter College Basketball Tournament 2023. Dr. D.N.Gokhale, Director of Instruction & Dean, VNMKV, Parbhani inaugurated the tournament on 29th August, 2023 



Training on Soybean Varietal Identification at VNMKV, Parbhani

The training on 'Soybean Varietal Identification' was conducted by Soybean Research Station of VNMKV, Parbhani on 29th August. Staff and officers of seed certification Aurangabad and Latur division visited the field of Soybean Research Station. Dr. S.P.Mehtre guided the participants on this occasion. 



Sunday, August 27, 2023

Prof. (Dr.) Indra Mani address the National Dialogue for Shaping the future of Indian Horticulture at New Delhi

New Delhi : An enlightening event, the National Dialogue for Shaping the Future of Indian Horticulture, took place on August 26, 2023, at the esteemed National Academy of Agricultural Sciences (NAAS) in New Delhi. Jointly organized by the Confederation of Horticulture Associations of India (CHAI) and the National Academy of Agricultural Sciences (NAAS), the event served as a pivotal platform for discussions and insights aimed at propelling the Indian horticulture sector forward.

Distinguished figures from academia, industry, and various segments of the horticulture realm gathered to exchange ideas, strategies, and knowledge for the advancement of this crucial sector. One of the esteemed speakers was Prof. (Dr.) Indra Mani, the Hon’ble Vice-Chancellor of VNMKV, Parbhani, who addressed the attendees.

In his address, Prof. (Dr.) Indra Mani emphasized the integral role of engineering applications throughout the entire horticulture value chain, from orchard to the end consumer's fork. He shared his vision that the future of horticulture is inevitably becoming "engineering horticulture," underscoring the fusion of technology and traditional practices.

He explain the significance of drone technology in revolutionizing orchard management. He highlighted how drones are not only crucial for monitoring crop health but also for ensuring the precise and effective application of pesticides and nutrients. The use of drone technology, according to him, marks a vital turning point in modern horticulture practices, promising enhanced efficiency and sustainability. He talked about the use of robotics in grafting, nursing management, and harvesting operations. He informed the gathering about the various facilities available at VNMKV, Parbhani such as grafting robots and advanced onion silage for the benefits of the farmers on a custom hiring basis.

The National Dialogue witnessed vibrant discussions, robust debates, and an exchange of innovative ideas on how to shape the future of Indian horticulture. This convergence of expertise, initiated by the collaborative efforts of CHAI and NAAS, is poised to steer the horticulture sector onto a dynamic trajectory of growth and technological advancement. As the event concluded, it left participants inspired and equipped with fresh perspectives to collectively navigate the exciting journey ahead in Indian horticulture. 


वनामकृवित शासन आपल्‍या दारी कार्यक्रम संपन्‍न

शासन आपल्‍या दारी कार्यक्रमानिमित्‍त राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंंदे, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्‍यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांच्‍या उपस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात कार्यक्रम संपन्‍न. विद्यापीठाचे कुलगुरू मा इन्‍द्र मणि यांचीही व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती 



विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारांची पाहणी करतांना





Tuesday, August 15, 2023

नांदेड जिल्‍हयातील विविध गांवाना माननीय कुलगुरू यांची भेट व मार्गदर्शन

स्‍वातंत्र दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी नांदेड जिल्‍हयातील धर्माबाद, कोठांळा, शिंदीगांव, हुडांपत्‍ती गुलतीगांव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भेट देऊन उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. शेतीत ड्रोन चा वापर, मानवी आहारात भरड धान्‍याचे महत्‍व यावर मार्गदर्शन केले. यावेळी कापुस विशेषज्ञ डॉ के एस बेग, उपकुलसचिव डॉ आर व्‍ही देशमुख, बियाणे तज्ञ डॉ एस एन देवकुळे, श्री दिलिप जाधव, कृषि विभागातील अधिकारी आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.