शेतकरी
केंद्र बिंदू ठेवून सर्वांनी कार्य करावे.......कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची ७२ वी रब्बी
विभागीय कृषी विस्तार व सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद येथील राष्ट्रीय
कृषी संशोधन प्रकल्प येथे ४ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. बैठकीस महाराष्ट्र
कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ रावसाहेब भागडे, संशोधन संचालक
डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद
विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव,
लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यलयाचे प्रतिनिधि श्री
पाटील, संशोधन सहयोगी संचालक डॉ सुर्यकांत पवार आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
मार्गदर्शनात
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की,
विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकरी केंद्रबिंदू ठेवून
काम करून विद्यापीठाच्या शिफारशी शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा दृष्टीने प्रयत्न करावे.
कृषि विद्यापीठ व औद्योगिक कंपन्या यांच्या बरोबर सामंजस्य करार करून
यांत्रिकीकरण, बीजोत्पादन, ड्रोन टेक्नॉलॉजी इत्यादी बाबत संशोधन व
प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन आधुनिक तंत्रज्ञान मिळवण्याच्या
दृष्टीने प्रयत्न केले जातील. विद्यापीठाचे नाव
उंचावण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावेत.
बैठकीत ४९
व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक मध्ये मंजूर झालेल्या शिफारशी
सादरीकरण विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी
केले. या शिफारशी येणाऱ्या रबी हंगामात शेतकऱ्यांना माहिती होण्याच्या दृष्टीने
कृषी विभागाच्या साह्याने पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल, विभागीय
कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मागील रब्बी व उन्हाळी हंगाम
मध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर उद्भवलेल्या विविध प्रत्याभरण याविषयी सादरीकरण केले. प्रत्येक प्रत्याभरण आधारित शास्त्रज्ञ तर्फे
विवेचन केले, काही प्रत्याभरण संशोधन वर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र व विस्तार
कार्य अधिकारी यांच्यामार्फत राबवलेल्या विविध विस्तार कार्याची सादरीकरण करण्यात
आले. येणाऱ्या रबी हंगामामध्ये शेतकरी बंधूंना विविध कृषी निविष्ठा याविषयी चर्चा
होऊन कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रूपरेषा ठरविण्यात आली. बैठकीस विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, कृषी संशोधन केंद्राचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक, विस्तार कृषी विद्यावेत्ता हे उपस्थित होते.
बैठकीचे
प्रास्ताविक डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले, सुत्रसंचालन
डॉ कांबळे मॅडम यांनी केले. डॉ पतंगे व
डॉ दिलीप हिंगोले यांनी आभार प्रदर्शन केले. बैठक यशस्वीतेकरिता राष्ट्रीय
कृषी संशोधन प्रकल्प, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद, कृषि तंत्र विद्यालय, फळ बाग
संशोधन केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.