On September 30th, 2022, a team of scientists from VNMKV, Parbhani visited
the remote villages of Jintur tehsil, namely Sawangi malhsa, Hiwarkheda, and
Dabha, as informed by respected MLA (Jintur) Smt. Meghanatai Bordikar, for the
diagnosis of pests and diseases in soybean. The University's scientists,
including Dr.G.D.Gadade, Dr.C.V.Ambadkar, Dr.D.D.Patait, and others, are
monitoring infected crops.
Friday, September 30, 2022
Visit of University's Scientists to Remote villages of Jintur Tehsil
Visit of Hon. Dr. T.R.Sharma to Aurangabad Campus
Hon. Dr T R Sharma, DDG (Crop Sciences), ICAR, New Delhi visited to Aurangabad Campus & Farmer's Field
Sunday, September 25, 2022
वनामकृवित स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती दिनांक साजरी करण्यात आली. कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Saturday, September 24, 2022
राज्याचे कृषिमंत्री मा.ना. श्री.अब्दुल सत्तार यांना वनामकृवि कर्मचारी संघाचे मागणीचे निवेदन
राज्याचे कृषिमंत्री
मा.ना. श्री. अब्दुल सत्तार यांना वनामकृवि कर्मचारी संघा निवेदन देऊन कर्मचाऱ्याच्या
समस्या व १०.२०.३० आश्र्वासित प्रगती योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि व विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर उपस्थित होते. निवेदन
देतांना कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रा. दिलीप मोरे, कार्यकारणी सदस्य श्री
कृष्णा जावळे, श्री
वैजनाथ सातपुते, श्री
एकनाथ घ्यार, श्री
विश्वाभर शिंदे, श्री
बालाजी कोकणे, श्री
विष्णु शिंदे आदीसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Friday, September 23, 2022
मौजे दवनगांव ता. रेनापुर जि. लातूर येथील शेतकरी बांधवाशी संवाद
"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे दवनगांव ता. रेनापुर जि. लातूर येथे शेतकरी बांधवाशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये महाडीबीटी, रुंद वरंबा सरी वर सोयाबीन चे प्रात्यक्षिक पाहणी व व्यवस्थापन, शेती पूरक जोड़धंदा - दुग्धव्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. उपक्रमान्तर्गत श्री प्रभाकर रामराव नागरगोजे यांच्या शेतीला भेट देऊन त्यांची पूर्ण माहिती घेण्यात आली.कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी श्री महेश क्षीरसागर, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. टाकनखार व दवनगांव गावातील ७० पेक्षा जास्त शेतकरी बांधव उपस्थित होते.
सौजन्य : विस्तार कृषि विद्यावेत्ता लातूर
Tuesday, September 20, 2022
वनामकृवि कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था म. परभणी ची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १८ सप्टेंबर रोजी परभणी कृषि महाविद्यालयाच्या सभागृह संपन्न झाली. सभेस प्रमुख पाहूणे म्हणून कुलगुरू डॉ इन्द्र मणि, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माननीय आमदार श्री. सुरेशरावजी वरपुडकर, माननीय आमदार डॉ राहुल पाटील, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. रामभाउ घाटगे, शिवसेनेचे युवा नेते मा. श्री. संग्राम जामकर आदी उपस्थित होते तर सभेचे अध्यक्षपद पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ पी. यु. घाटगे यांनी भूषवले. सभेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शिवाजी म्हेत्रे, सचिव श्री. सुनिल खताळ, संचालक डॉ. राजेश कदम, डॉ महेश देशमुख, डॉ शामराव घुगे, श्री.जी.बी. उबाळे, श्री. राम खोबे, श्री. सुरेश हिवराळे, श्री. भारत उबाळे, श्री. बालाजी कोकणे, श्री. रावजी खरोडे, श्री. कृष्णा जावळे, श्री. किशोर शिंदे, श्रीमती अर्चना घनवट, सौ. सुधा सालगोडे आदीसह सस्थेचे सन्माणनीय सभासद मोठया प्रमाणात उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा
सत्कार करण्यात आला. सभेत मृत्यु पावलेल्या सभासदांना स्तब्धता
पाळून श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. सभेत ४५ वा वार्षिक
अहवाल वाचन पतसंस्थेचे चेअरमन तथा सभेचे अध्यक्ष डॉ पी. यु. घाटगे यांनी केले
तसेच मागील सभेचे प्रोसेडिंग संस्थेचे सचिव श्री. अे. डी. काळे यांनी वाचन केले. सभेत
सभासदांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले आणि महत्वपुर्ण
निर्णय घेण्यात आले, यात दिर्घमुदती कर्ज वाटप मर्यादा
सर्व टप्प्यांमध्ये वाढवून चार लाखापासुन ते वीस लाखापर्यंत करणे. सर्व जमा ठेवीवरील व्याज
दर एक टक्का कमी करणे. संस्थेला झालेल्या सन. २०२१-२०२२ वर्षाच्या नफ्यातून १२ टक्के लाभांष वाटप तथा भेट वस्तु म्हणून बॅगेचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Sunday, September 18, 2022
मौजे खंडाळा तालुका वैजापुर येथील शेतकरी बांधवाच्या शेतातील विद्यापीठ विकसित बाजरी एएचबी-१२६९
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील अखिल भारतीय समन्वय प्रकल्पामार्फत इक्रीसॅट संस्था व जोधपूर येथील अखिल भारतीय बाजरी समनव्यक प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय स्तरावर जैवसंपृक्त बाजरी संकरित वाण एएचबी-१२०० व एएचबी-१२६९ विकसित केलेले आहेत. या वाणामध्ये लोहाचे प्रमाण ८७ पीपीएम व जस्तचे प्रमाण ३७ पीपीएम आहे त्याच प्रमणे एएचबी-१२६९ वाण मध्ये लोह ९१ पीपीएम व जस्त ४३ पीपीएम आहे. या वाणाचे प्रात्याक्षिके वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथे श्री सुभाषराव सुर्यवंशी, पांडुरंग सुर्यवंशी आदीसह इतर शेतकरी बांधवाना देण्यात आले होते. सदरिल कार्यक्रम माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत संघटनेने व भारत सरकारने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने पीक पद्धतीत व आहारात बाजरी पिकाचा समावेश करून बाजरी पिकाविषयी शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने व मूल्यवर्धनाच्या दृष्टीने विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे शेतकरी त्यामुळे शेतकरी बंधूंना अन्नसुरक्षा बरोबरच पौष्टिक सुरक्षा चे महत्व पटवून या पिकांचा पीक पद्धतीत व आहारात समावेश करण्याच्या दृष्टीने जनजागृती चालू आहे, अशी माहिती सहयोगी संचालक डॉ सुर्यकांत पवार यांनी दिली.
Friday, September 16, 2022
Thursday, September 15, 2022
Celebration of Engineer's Day
Celebration of Engineer's Day by College of Agricultural Technology & Engineering, VNMKV, Parbhani in presence of Hon'ble Vice-Chancellor Dr. Indra Mani.
Tuesday, September 6, 2022
Visit of Bayer CropScience Ltd Team to VNMKV, Parbhani
Team of Bayer CropScience Ltd visited VNMKV on 7th September, 2022 and met with the Dr.Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor. VNMKV’s authorities Dr.D.N.Gokhale (DI & Dean), Dr.D.B.Deosarkar (DEE), Dr.G.K.Londhe (DDR), Dr.K.S.Baig, (AD, Seed), Dr.K.P.Apet (Head, Pl. Path), Dr.H.V.Kalpande (Head, Ag. Botany), Dr.S.S.More, Dr.G.U.Shinde (PI, NAHEP), Dr.Godawari Pawar, Dr.P.S.Kapse (PRO) were present. Bayer Team led by Dr. Tarun Sharma (Head, Field Crops), Dr. P. Sravan Kumar (Head, Agronomy Systems), Dr. Omprakash Patil (Market Dev. Coordinator), Mr. Girish Palaskar (Market Dev. Coordinator), and Dr. Rajendra Patil were also present.
The meeting was presided over by the Hon'ble VC sir, he emphasized that University wants to develop strong industrial relationship for the welfare of farmers and agricultural development. During the meeting, major issues related to possible collaboration of the University with the Bayer CropScience in the field of agricultural education, research and extension education were discussed. Collaborative works such as Common demonstration of technologies through farmers participatory action research (FPAR) programme, increase in girls student employment in the Bayer (Samavesh Programme), supporting PG students research work, licensing and commercialization of proven technology of the University, farmers participatory seed production and upliftment of some research centres of the University were discussed. Potential partnership on research in nematode management in banana, vegetables, and drone applications in agriculture were also discussed.
Thursday, September 1, 2022
मौजे तादलापुर ता. उदगीर जि. लातूर येथील शेतकरी बांधवांशी संवाद
सौजन्य : विस्तार कृषि विद्यावेत्ता लातूर