Thursday, December 28, 2023

कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर राबवावे.......डॉ. इन्द्र मणी



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विद्यापीठाचे व कृषीचे इतर प्रगतंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणी यांनी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथे केले. कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरच्या सोळाव्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत आयोजित प्रक्षेत्र फेरी दरम्यान ते बोलत होते. या समयी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मारवाळीकर व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते
 कुलगुरू डॉ. इन्द्र मणी पुढे म्हणाले की कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मच्छी पालन, अंडी उबवणूक, कुकूटपालन शेळीपालन एकक या प्रात्यक्षिकांमधून येथे भेट देणारे शेतकरी पशुपालक बोध तर घेतीलच परंतु कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी हे प्रयोग प्रात्यक्षिक जशास तसे शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून शेतकऱ्यांचा पशुपालकांचा विश्वास तर द्विगुणित करावाच त्यासोबत त्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे परिसरातील इतर शेतकरी यशस्वी शेतकऱ्यांचे अनुकरण करतील आणि अशा प्रकारे शेतीतील प्रगती साधता येईल. तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर हे तीर्थक्षेत्र श्री तुळजाभवानी शहरालगत असल्यामुळे याला एक वेगळे महत्त्व असून विद्यापीठ या कृषि विज्ञान केंद्राच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षाच्या काळात या परिसराचा चेहरा मोहरा आपण बदलून दाखवू असे ते म्हणाले.
 दरम्यान पहिल्या सत्रात पार पडलेल्या वैज्ञानिक सल्लागार समितीचा समारोप करताना डॉ. इन्द्र मणी म्हणाले की धाराशिव जिल्ह्यातील सर्व सहयोगी विभागांनी, कृषी विज्ञान केंद्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सूचना कराव्यात जेणेकरून त्या सूचनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान वाढवून त्यांच्या उत्पादनात देखील दुपटीने वाढ करता येणे शक्य होईल अशा सर्व सूचनांचे आम्ही स्वागत करून त्यांची ताबडतोब अंमलबजावणी करण्याची त्यांनी ग्वाही दिली. वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीच्या प्रारंभी कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी प्रास्ताविक तसेच इतर सर्व शास्त्रज्ञांनी विविध विभागांचे सादरीकरण केले. सदरील बैठकीस वनामकृवि, परभणी चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ हुलसुरे जिल्हा पशु सवर्धन अधिकारी डॉ पुजारी व इतर सहयोग विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 सरते शेवटी कृषी विज्ञान केंद्राच्या अतिशय जिव्हाळ्याची असणारी संरक्षक भिंतीचे भूमिपूजन सौ व श्री डॉ. इन्द्र मणी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, विभागाचे श्री दयानंद टेकाळे श्री ढगे, गुत्तेदार श्री बालाजी जाधव, कृषी संशोधन केंद्राचे श्री लतीफ चौधरी तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ विजयकुमार जाधव, आभार प्रदर्शन डॉ भगवान आरबाड यांनी तर यशस्वीतेसाठी डॉ. भैयासाहेब गायकवाड, डॉ दर्शना भुजबळ, श्रीमती अपेक्षा कसबे, डॉ नकुल हारवाडीकर, श्री बालाजी कुंभार, श्री जगदेव हिवराळे, शिवराज रुपनर, बालाजी कदम, मोरेश्वर राठोड, शत्रुघ्न रनेर आदींनी प्रयत्न केले.

Tuesday, December 19, 2023

Hon. Dr. Indra Mani addressed the National Symposium cum Industrial Meet (NSIM) 2023 at Pune

Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of VNMKV, Parbhani, addressed the National Symposium cum Industrial Meet (NSIM) 2023 on 'Agri-business in Alliums: Innovation, Promotion & Sustainability,' organized by the Agricultural Business Incubator (ABI) and Innovation and Technology Management Unit (ITMU) of ICAR – Directorate of Onion & Garlic Research, Pune on 20th December, 2023.

Monday, December 18, 2023

AIU West Zone Vice-Chancellors Meet for the year 2023-24 at Mumbai

 

The Association of Indian Universities (AIU) West Zone Vice-Chancellors Meet for the year 2023-24 on the Future of Work & Skill Development was hosted by Somaiya Vidyavihar University, Mumbai, from December 19-20, 2023. Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of VNMKV, Parbhani, attended the event and actively participated in the discussions.

Saturday, December 16, 2023

विद्यापीठ विकसित गोदावरीच्या प्लॉटवर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट

श्री श्याम शेषराव पठाडे, वरझडी तालुका छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतावरील तुरीचे विद्यापीठ विकसित गोदावरीच्या प्लॉटवर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट

सदर शेतकऱ्याने कोबी पिकाचे आंतरपीक घेऊन अडीच लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. आणि सध्या कमीत कमी एकरी 15 क्विंटल तूर होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. याबाबतीत मा. कुलगुरू महोदयांनी शेतकऱ्यांच्या शेतावर सहभागी तत्त्वावर संशोधन करण्याची सूचना कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. के टी जाधव आणि डॉ डी के पाटील यांना दिली.

Thursday, December 14, 2023

वनामकृवि आयोजित बाराव्‍या राष्ट्रीय बियाणे परिषदेचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली, आणि राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्याण विभाग, कृषि मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन दिनांक ११ ते १३ डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले होते. सदर परिषदेच्‍या समारोप दिनांक १३ डिसेंबर रोजी झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक  पद्ममभूषण मा डॉ आर एस परोडा होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते. व्‍यासपीठावर आयएसएसटीचे अध्‍यक्ष डॉ डि एस गुप्‍ता, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, आयोजन सचिव डॉ के एस बेग, आयएआरआय विभाग प्रमुख डॉ शिव के यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा डॉ आर एस परोडा म्‍हणाले की, देशातील हवामान हे विविध पिकांच्‍या बीजोत्‍पादनास अनूकुल असुन बियाणे निर्याीतीस भारतास मोठा वाव आहे. देशांतर्गत बियाणाची गरज भागवून आपण अगदी नगण्य अशी बियाणे निर्यात करतो आहोत; दर्जेदार बियाणे निर्मिती करणे हे पहिले धेय्य असेल पाहिजे. बियाणे कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. बियाणे उत्पादन वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने निर्यातीचीही संधी आहे. बियाण्यांच्या एकुणच विकास आणि विस्तारात शेतकरी प्रथम कसा घेता येईल, यासह आपल्या भविष्यातील अपेक्षा व भुमिका लक्षात घेऊन बियाण्यासाठी रोडमॅप तयार करावा लागेल. शेतकरी वाण सुरक्षा तसेच त्या संदर्भातील नोटिफिकेशनची पध्दती सुलभ करण्याची गरज आहे. बियाणे उद्योग विस्तारासाठी सर्वांनी एकसंघ होऊन काम करावे लागेल. युवकांचा बियाणे उद्योग विस्तारात कसा उपयोग होतो किंवा त्याला कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहावे लागेल. बियाण्याविषयी समाजाची जागरुकता वाढवावी लागेल. त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतील. बियाणे बदलातील विशेष करुन संकरीत वाणाची बियाणे बदलातील प्रमाण अत्यंत कमी असल्याचे डॉ. पराडा म्हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, कृषि क्षेत्राचा विकास करण्यासाठी चार गोष्टीची आवश्यकता लागते यात कृषि शास्त्रज्ञ, कृषि उद्योजक,  शेतकरी आणि सरकार या चार क्षेत्रातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. डॉ. यादव यांनी तांत्रिक क्षेत्रातील महत्वाच्या मुदयाचा उभा करुन सुचविलेल्या शिफारसीची माहिती दिली. प्रास्‍ताविक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डी जी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ के एस बेग यांनी केले.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे (वनामकृवि) कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची बदलत्या हवामान स्थितीत नवसंशोधन व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी निर्माण झालेली आव्हाने ही संकल्पना होती.परिषदेत उत्तम सादरीकरण करणा­यांना तसेच पोस्टर स्पर्धकांना या वेळी गौरविण्यात आले. परिषदेच्या आयोजनासाठी निमंत्रक ‘वनामकृवि’ चे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, आयोजन सचिव कापुस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांनी या परिषदेसाठी परिश्रम घेतले. तीन दिवसीय सदर परिषदेस देशाचे व राज्याचे कृषि शास्त्रज्ञ, बियाणे उद्योजक, प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याचे प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी आदींनी सहभाग नोदंविला होता. परिषदेमध्ये एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चा सत्रांमध्ये बियाणे विषयक विविध विषयांवर संशोधन व तंत्रज्ञाना संबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकरण व चर्चा झाली.


Sunday, December 10, 2023

बाराव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे उदघाटन

दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी संशोधना सोबतच निधीची ही आवश्यकता .... डॉ. मंगला राय यांनी राष्ट्रीय बियाणे परिषदेत व्यक्त केल्या भावना

छत्रपती संभाजीनगर येथे बाराव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ परभणी आणि इंडियन सोसायटी टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, वाराणसी यांच्या सहकार्याने कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगला राय म्हणाले की, बदलत्या हवामानानुसार बियाणे संशोधनाची दिशाही बदलावी लागेल आणि यासाठी निधीची देखील गरज भासणार आहे. आपल्या देशात जगाच्या 18% लोकसंख्या आहे त्यामुळे या सर्व नागरिकांच्या समतोल आहार सोबतच जीवनमान उंचावणे याचे नक्कीच मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. यासाठी देशातील सर्व संशोधन संस्थांनी समन्वयाने काम करत काळानुरूप संशोधन करण्याची गरज आहे. यामुळे नक्कीच आपल्या संशोधनाचा गौरव वाढण्यास मदत होईल. या परिषदेचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी केले. आपला मराठवाडा विभाग हा बदलत्या हवामानाच्या कचाट्यात सापडत आहे, कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाऊस यामुळे हातात आलेली पिके शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. त्यामुळे नेमकी यासाठी कशा प्रकारचा संशोधनाची दिशा लागेल याची दिशा ठरणारी ही बैठक राहील असं मला विश्वास आहे. पुढील दोन दिवस शेतकरी बांधवांना उपयोग होणारी सर्व चर्चा होईल अशी मला संशोधकाकडून अपेक्षा आहे. या परिषदेतून भविष्यातील शेती संशोधन कशा प्रकारचे असावे यासाठी नक्कीच दिशा देणारे राहील याची मला खात्री आहे. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी भाषने केली, त्यामध्ये प्रामुख्याने देशातील एकंदरीत बदलते हवामान आणि त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान यासाठी विभागवार विद्यापीठाने पुढाकार घेत योग्य ते संशोधन निर्मिती करण्याची गरज आहे. यामध्ये साधारणता: पिकाच्या कालावधीचा विचार करून आपापल्या हवामानाचा विचार करत योग्य ते संशोधन शेतकऱ्याला कसे सोयीचे होईल याचा विचार करणे गरजेचे आहे अशा एकंदरीत सर्वच मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केल्या. या कार्यक्रमांमध्ये विशेषतः पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अतिशय आवेशपूर्ण असे भाषण केले. त्या म्हणाल्या की, मी कुठली शाळा शिकलेली नाही पण आज माझा शेतीविषयाचा अनुभव बघता कृषी पदवीधर देखील माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी येतात आणि कार्यक्रम संपल्यानंतर माझे फोटो काढत आहेत. त्यांना माझी एकच विनंती की, माझ्यासोबत फोटो काढण्याऐवजी तुम्ही माझ्या विचाराची कास धरत शेती करावी असे शेवटी म्हणाल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. जी. मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर केंद्रीय कृषी आयुक्त भारत सरकार डॉ. पी.के. सिंग, माजी अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ डॉ. सी. डी. मायी, डॉ. एच. एस. गुप्ता, आयएसएसटी, डॉ. एस. ए. पाटील माजी संचालक भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली डॉ. बीजेन्द्र सिंग, आचार्य नरेंद्र देवा कृषी विद्यापीठ, आयोध्या श्री अजय राणा, एफएसआयआय, नवी दिल्ली श्री. राजू बारवाले, चेअरमन महिको ग्रुप, मुंबई बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे, प्रयोगशील शेतकरी हरियाणा पद्मश्री कंवल सिंग चव्हाण डॉ. डी. के. श्रीवास्तव, सह आयुक्त गुणवत्ता नियंत्रण, भारत सरकार, नवी दिल्ली, डॉ. डी. पी. वासकर,  संचालक संशोधन तथा संयोजक इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेसाठी देशभरातील शास्त्रज्ञासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांची मोठी उपस्थिती लाभली.


 

 

Friday, November 24, 2023

वनामकृवि विकसित तुरीचे वाण गोदावरी... बहरलेले शेतकरी बांधवांच्या शेतात


कंडारी येथील बहरलेल्या गोदावरी तुरीच्या प्रक्षेत्रास मा. कुलगुरु मिश्रा यांची भेट.
दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय कुलगुरू इंद्र मनी मिश्रा, वनामकृवी परभणी यांनी कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञा समवेत गोदावरी वाणाची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या शेतावरती भेट दिली. सध्या कंडारी तालुका बदनापूर येथे दोनशे एकर क्षेत्रावर गोदावरी वाणाची लागवड करण्यात आली आहे अशी माहिती येथील शेतकरी राजेंद्र शिंगारे यांनी दिली. राजेंद्र शिंनगारे यांनी 2020 मध्ये एक किलो गोदावरी वाणाचे बियाणे कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून आणले. त्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये आपल्याकडील बियाणे इतर शेतकऱ्यांना दिले. दोन वर्षांमध्ये गोदावरी वाणाची 18 क्विंटल पर्यंत प्रति एकरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाल्याचे राजेंद्र शिंगारे यांनी माहिती दिली. उत्पादकता पाहता शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर गोदावरी वाणाची लागवड केली आहे. 
बद्रीनाथ फटाले, कंडारी यांनी 25 मे रोजी गोदावरी वाणाची लागवड केली. केवळ 10: 26:26 नत्र स्फुरद पालाश 100 किलो प्रति एकरी आणि आतापर्यंत केवळ एक कीटकनाशकाची फवारणी केली आहे.
इतक्या कमी लागवड खर्चा वरती एकरी वीस क्विंटल तुरीचे उत्पादन मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कृषी संशोधन केंद्र बदनापूर द्वारे विकसित केलेले वाण बीडीएन २, बीडीएन ७११ आणि नव्याने प्रसारित केलेली गोदावरी केवळ राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माननीय कुलगुरूंनी माहिती दिली. आणि म्हणूनच यांची लागवड महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात सारख्या राज्यांमध्ये सुद्धा होत असल्याचे दिसून येत‌ असल्याचे नमूद केले. कमीत कमी लागवड खर्च आणि अधिक उत्पादन याचा विचार करता तुरी सारख्या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे माननीय कुलगुरू यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सल्ला दिला आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये होण्याची गरज असल्याचे नमूद केले.
यावेळी कृषि संशोधन केंद्राचे, प्रभारी अधिकारी डॉक्टर केटी जाधव, डॉक्टर डी के पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा व प्राचार्य, डॉक्टर आर डी अहिरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख,  डॉक्टर सचिन सोमवंशी, डॉक्टर पी ए पगार, डॉक्टर गीते आणि ईतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Sunday, November 19, 2023

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी सेवा केंद्रास माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. इन्‍द्र मणि यांनी दिनांक १८ नोव्‍हेंबर रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी सेवा केंद्रास भेट दिली यावेळी त्‍यांनी केंद्राच्‍या कृषि व ग्राम विकास विभागाच्‍या सदस्‍या बरोबर चर्चा केली. यावेळी केंद्राच्‍या संचालिका ब्रह्माकुमारी अर्चना बहनजी और ब्रह्माकुमार तांदले भाईजी यासह केंद्राचे इतर सदस्‍य उपस्थित होते.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ  इन्‍द्र मणि म्‍हणाले की, अहंकार, व्‍देष, स्‍वार्थ हे मानवाच्‍या प्रगतीतील मुख्‍य अडथळे असुन व्‍यक्‍ती कितीही विव्‍दान असला तरी त्‍यांच्‍या मध्‍ये विनय पाहिजे. आज युवकांना मार्गदर्शन करण्‍याची अत्‍यंत गरज असुन प्रजापिता ब्रम्‍हाकुमारी सारख्‍या संस्‍थांनी पुढाकार घ्‍यावा.   


अल्पसंख्यांक मंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चि. अमेर सत्तार यांच्‍या विवाह सोहळास कुलगुरू यांची उपस्थिती व शुभेच्‍छा

अल्पसंख्यांक मंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा हा विवाह सोहळा दिनांक १९  नोव्‍हेंबर रोजी शाही उत्‍साहात पार पडत आहे. लग्‍न सोहळयास राज्‍यातील अनेक बडे नेत्‍यांनी हजेरी लावली होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी लग्‍न सोहळयास उपस्थित राहुन नवदांपत्‍यास शुभेच्‍छा दिल्‍या. 

Sunday, October 22, 2023

Field visit at Rajewadi, Tq. Selu

A field visit was organised at Rajewadi Tq. Selu Dist. Parbhani on the field of Shri Dhanraj Wamanrao Kendre on 22nd October 2023. The programme was presided by Dr Indra Mani, Hon. Vice Chancellor, VNMKV, Parbhani, MLA Shri Babajani Durani, Krishi Bhusan Shri. Kantrao Deshmuk, Dr. K.P. Gore, Former Vice Chancellor, Dr. U M Khodke, DI & Dean, Shri Kale, Additional Superintendent of Police, Parbhani, Shri. Vishwambhar Gawande, retired RDC, Dr BV Asewar, ADP, College of Agriculture, Golegaon and Dr V S Khandare, ADP, Horticulture College, SD Raswae and progressive farmers Shri Sampati Wamanrao Kendre, Ramrao Wamanrao Kendre, Jaywant Kendre, Gaikwad, and graced the occasion.     Shri Dhanraj Kendre is a retired additional collector has become inspiration for farmers and agriculture enthusiastic by transforming there 40 acres of ancestral land into a thriving sweet orange estate. Having serving administrative services for several decades at State Government returned his native village in 2014. Adjoining area is known for cultivating cotton soybean and sugarcane crops traditionally. However, poor yields and unpredictability associated with climate change have made many farmers to leave with minimal returns. At this juncture it is a perfect example Shri Kendre has shown the farmers how to adapt to the climate change for sustainable livelihood by switching over to the cultivation of fruit crops. Shri.Kendre  in 2018  planted sweet orange variety Nucellar in the month of June on a area of 40 acres. The hard work has paid off now and the orchard is now in bearing condition, there is fruit bearing in cluster, per cluster 7-8 fruits, uniform fruit size and expected to yield 150 tons with returns of Rs 35 lakhs approximately. The joy of successful story doesn't end here. He is leading the joint family with total 36 family members all working together in the field. He emphasis on  capacity building of women's and youngsters in the family. He further added his retired life is in quality because of joy of creating an orchard, absence of traffic hassles, unadulteral milk and fresh vegetable here is unmatched. On the occasion, Dr Indra Mani advised and guided Kendre family on water conservation, micro irrigation and mechanization aspects of orchard management and Agrotourism.








Friday, October 20, 2023

Agribizz 2k23 - Farewell to Outgoing Batch & Welcomes Freshers with Grand Event

Chakur, 20th October 2023 : The Post Graduate Institute of Agribusiness Management (PGIAM), Chakur hosted a memorable farewell and welcome event, Agribizz 2k23, to bid adieu to the outgoing batch and extend a warm welcome to the new batch of students. The event took place on the 20th of October, 2023, and was graced by the esteemed presence of Dr. Prof. Indra Mani, Honorable Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani. Dr. U.M. Khodke, Director of Instructions, and Mr. Niketan Kadam (IPS), Asstt. Superintend of Police, Chakur were Chief guest of the function. The organizer Dr. R.V. Chavan, Associate Dean, PGIABM, Chakur, Dr. B.M. Thombare, Associate Dean (CoA, Latur), and Dr. Jagdish Jahagirdar, Associate Dean (VDABC, Latur) were present on the dais.

The event kicked off with an emotional farewell to the outgoing batch of students. The departing students were lauded for their hard work and dedication during their time at the institute.

During the event, the dignitaries shared words of wisdom and inspiration with the students. Dr. Prof. Indra Mani, the Honorable Vice-Chancellor, emphasized the importance of management in life, the importance of innovation and research in agribusiness, encouraging the students to be the torchbearers of change in the agricultural sector. 

Dr. U.M. Khodke, Director of Instructions, encouraged the students to be proactive in their learning and make the most of the educational opportunities provided by the institute. H said management students are always smart and it is seen in the program. Management is applicable in each corner of Agriculture. Mr. Niketan Kadam said agriculture is an emerging field and management in Agriculture has wider scope.

Dr. Ranjit Chavan given Intrductory Remarks and mentioned about the golden moment of three batches altogether celebrating the program, this is rare event.

The evening was not just about speeches and advice. It also featured cultural performances, showcasing the diverse talents of the students. Music, dance, and drama added an element of entertainment and festivity to the event, fostering a sense of camaraderie among the students. Agribizz 2k23 marked the beginning of a new academic year at the Post Graduate Institute of Agribusiness Management, Chakur, promising an enriching and fulfilling experience for both the outgoing and incoming students. As the outgoing batch bids farewell to their alma mater, and the freshers embark on a new journey, the event captured the spirit of growth, learning, and the unbreakable bond that ties the Agribizz family together.





Thursday, October 19, 2023

SEA Innovation Award-2023 received by CFT Team

CFT team of Sugreev Shinde, Sangram Wandhekar, and Dr. R. B. Kshirsagar (Research guide) received the Shri Somalal Vyas SEA Innovation Award-2023 for the innovation "Extraction, Characterization and Quality evaluation of Wood Apple Seed Oil and it's Utilization in Food Products" with the hands of Shri Sanjeev Chopra (Secretary, Ministry of Consumer Affairs Food and Public Distribution), Dr. Jerry Sambuaga (Vice minister of Trade of Indonesia), Shri Nadir Godrej (Chairman Godrej Industries), Shri Pasha Patel, Shri Ajay Jhunjhunwala (President, SEA), Shri. Atul Chaturvedi and Dr. Prabodh Halde in the 52nd Annual General Meeting and award function at the Westin hostel Pawai, Mumbai.