राहुरी येथे आयोजित जॉइंट ऍग्रोस्को कार्यक्रमात सत्कार
कृषीमंत्री ना श्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ दीपक पाटील यांना उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि सह राज्यातील इतर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र कृषी संशोधन विस्तार परिषदेचे महासंचालक मा श्री रावसाहेब भागडे, संशोधन विस्तार डॉ हरिहर कौसडीकर आदीसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
डॉ दिपक पाटील मागील वीस वर्षांपासून ते कृषी संशोधन केंद्रात संशोधन निर्मिती करण्याचे काम सातत्याने करतात मूग ,तूर ,हरभरा या पिकाचे त्यांनी अनेक सुधारित वाण निर्मितीत आपले योगदान दिले आहे. मार्गदर्शनाखाली तूर वान बिडीएन ७११ ची निर्मिती मागील १० वर्षांपूर्वी झालेली आहे, हा वाण राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरला आहे. या वाणानी राज्यात 50 टक्या पर्यन्त तूर क्षेत्रावर लागवड केला जातो. मूग या पिकात बिडीएन २००३-०२ हा वाण गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून उत्पादन सातत्य ठेवून आहे. मागील दोन वर्षापूर्वी त्यांनी गोदावरी म्हणजे बिडीएन २०१३-४१ या वाणाची निर्मिती केली आहे, हा वाण मर व वांझ रोगास प्रतिकारक आहे आणि बागायती शेतकरी अधिक पसंदी देत आहे शिवाय अतिवृष्टीत ही तग धरत असल्याने हा वान तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रिय झाला आहे. या कृषी शास्त्रज्ञाची उत्कृट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित होणे हे विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानाची बाब.
No comments:
Post a Comment