Monday, September 25, 2023
Friday, September 22, 2023
वैजापुर तालुक्यातील शंभर शेतकरी बांधवाच्या शेतात वनामकृवि विकसित बाजरी वाणांचे प्रात्यक्षिके
मौजे खंडाळा तालुका वैजापूर येथे बाजरी शेती दिन साजरा
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन
प्रकल्पाच्या अखिल भारतीय समन्वय प्रकल्पा मार्फत आंतरराष्ट्रीय इक्रिसॅट (ICRISAT) संस्था
व जोधपुर येथील अखिल भारतीय बाजरी समन्वयक प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यामाने औरंगाबाद
जिल्हयातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा, बाबुळतेल,
नायगाव्हण येथे राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व कृषि विभाग आत्मा यांच्या मार्फत
१०० शेतकरी बांधवांना एएचबी-१२०० संकरित बाजरी वाणचे बियाणे प्रात्याक्षिकाकरिता देण्यात
आले होते. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
दिनांक २१
सप्टेंबर रोजी शेती दिनाचे औचित्य साधुन शेतकरी बांधवांना वाणाचे गुणधर्म, लागवड व
पिक पद्धती व आहारातील महत्व या विषयावर
चर्चा करण्यात आली. सन २०२३ वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने व भारत सरकारने
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्या
अनुषंगाने बाजरी पिकाचा पीक पद्धतीत व आहारात समावेश करून बाजरी पिकाविषयी
शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने व मूल्यवर्धनाच्या दृष्टीने
विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न चालू आहेत. यादृष्टीने डॉ सूर्यकांत पवार यांनी
मार्गदर्शन केले.
इक्रिसॅट आणि वनामकृविच्या वतीने बाजरीचा जैवसंपृक्त संकरित वाण एएचबी १२०० (AHB-1200) आणि एएचबी १२६९ (AHB-1269) असुन यात इतर बाजरी वाणाच्या तुलनेत लोह व जस्ताचे प्रमाण अधिक आहे. एएचबी १२०० यामध्ये लोहाचे प्रमाण ८७ पीपीएम व जस्तचे प्रमाण ३७ पीपीएम आहे त्याच प्रमणे एएचबी १२६९ (AHB-1269) वाण मध्ये लोह ९१ पीपीएम व जस्त ४३ पीपीएम आहे.
शेती दिन कार्यक्रमास सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री अनिल कुलकर्णी श्री तालुका कृषी अधिकारी वैजापूर वेंकट ठक्के, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ दिलीप हिंगोले, कृषी विद्या तज्ञ डॉ चंद्रकांत पाटील, पीक पैदासकार डॉ आशिष बागडे, कृषी बाजरा संशोधन केंद्राचे श्री एन एन कुंदे, कृषी पर्यवेक्षक श्री विशाल दागोडे, कृषी सहाय्यक श्रीमती जेजुरकर मॅडम, कृषी पर्यवेक्षक श्री दत्ता पुंड शिवूर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री प्रसाद शिंदे, शेतकरी श्री अशोक पवार, श्रीमती सुनिता अशोक पवार, सुभाष सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, नामदेव सूर्यवंशी, छगन पवार, चंद्रकलाबाई पवार, ज्योती सूर्यवंशी, संजय बागुल, सुदाम पवार, रविंद्र पवार, सुनील पवार, परमेश शेख, राजेंद्र जानराव भगवान सूर्यवंशी, संतोष गाडेकर, लक्ष्मण सूर्यवंशी, पंडित गाडेकर, जिजाबाई सूर्यवंशी, रंजना गायकवाड, ज्ञानेश्वर घोडेकर, अकबर शेख इत्यादी उपस्थित होते. यावेळी शेतकरी बंधू यांनी या वाण विषयी मनोगत व्यक्त केले.
Saturday, September 16, 2023
Friday, September 15, 2023
Thursday, September 14, 2023
Monday, September 11, 2023
Saturday, September 9, 2023
अन्न पोषण आणि आर्थिक सुरक्षेसाठी भरडधान्य पिके महत्वाची ....... वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान (ICAR-IIMR), हैदराबाद आणि कृषि शास्त्र, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने “भरडधान्य: श्री अन्न” या २१ दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन भाकृअनुप - भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान (ICAR-IIMR), हैदराबाद आणि कृषि शास्त्र, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने भरडधान्य (श्री अन्न): शाश्वत शेती, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास आणि पोषण सुरक्षा साठीचे आदर्श पीक या एकवीस दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक ७ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान करण्यात आली असुन दिनांक ७ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषि शिक्षण) डॉ. आर सी अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे उपस्थित होते. आयआयएमआरचे संचालक डॉ. तारा सत्यवती, कृषि शास्त्र संस्थापक निखिल यादव व सहसंस्थापक कोमल कुटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांना भरडधान्य हे वरदान असून ग्रामीण भागात हे चांगले उत्पादनाचं साधनं ठरतं आहे, यामुळे महिला आणि तरूण वर्गामध्ये उद्योजकता विकासाला चालना मिळाली आहे. देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षेमध्ये भरड धान्य मोलाची भूमिका बजावत आहेत. संबंधित संस्थाची प्रशंसा करत ते पुढे म्हणाले की, जागतिक भरडधान्य उत्कृष्टता केंद्र हे विविधता, न्याय, परिवर्तनशीलता आणि आरोग्य या चार उद्देश समोर ठेवून देशभरातील भूक कमी करण्यासाठी सदैव कार्यरत आहे. बदलत्या हवामानानुसार जैवतंत्रज्ञान, निवड पद्धती व संकर निर्मिती या माध्यमातून अधिक उत्पादक क्षमता आणि अधिक गुणवत्ता असणारी विविध भरडधान्य पिके जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरी, शामुल, कोदरा आदी पिकांच्या विविध वाण विकसित करत आहेत. कृषि शास्त्र, अकोला हे संशोधन ते शेतकरी यांना जोडणारा दुवा म्हणून काम करत आहे.
अध्यक्षीय भाषणात उपमहासंचालक डॉ. आर सी अग्रवाल म्हणाले की, देशात विविध प्रकारचे भरडधान्य उत्पादीत केली जातात. भरडधान्य ही आरोग्यवर्धक असुन त्याचा जनमानसातील आहारात वापर वाढीकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रशिक्षणात देशपातळीवर विविध कृषि विद्यापीठ, संशोधन केंद्र व कृषि संस्थेतील पाचशे
सहभागी नोंदविला असुन भरडधान्य
वाण सुधारणा, मूल्यवर्धन, उद्योजकता
विकास आणि विक्री, पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य फायदे,
बिज उत्पादन केंद्र तसेच संबंधित शेतकरी उत्पादक संस्था आदी बाबी
समाविष्ट आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगप्पा यांनी केले तर आभार प्रदर्शन
डॉ. व्यंकटेश्वरलू रोंडा यांनी केले.
Wednesday, September 6, 2023
Tuesday, September 5, 2023
Visit of VNMKV Scientists to farmers field
Best AICRP Oilseed Centre Award & Certificate of Excellence
AICRP on Safflower, VNMKV, Parbhani received Best AICRP Oilseed Centre Award and Certificate of Excellence by QRT constituted by ICAR, New Delhi. Also Dr. S.B.Ghuge, Officer Incharge, AICRP Safflower is facilitated for development of Safflower variety PBNS-184. These awards are given in Annual Group Meet (Linseed & Safflower) held at IGKV, Raipur on dt. 05.09.2023.
Monday, September 4, 2023
Friday, September 1, 2023
Review Meeting of the 12th National Seed Congress 2023
Meeting of Stakeholders of the 12th National Seed Congress 2023 was conducted at NASC, New Delhi. Agenda of the meeting was finalization of the modalities of the organisation of the 12th National Seed Congress 2023 held at Aurangabad by VNMKV, Parbhani. Stakeholders viz., ISST, New Delhi, NSRTC, Varanasi, DAC, New Delhi were participated in the meeting. Dr. Indra Mani, Hon'ble Vice-Chancellor, VNMKV, Parbhani was chair the meeting, Dr. HS Gupta, President, ISST, Mr. Manoj Kumar, IAS & Director, Dr. Malivaka Dadlani Former Joint Director (Research) of IARI, Dr. DP Waskar, Director of Research, VNMKV, Parbhani, Dr. K.S.Baig, Organizing Secretary, NSC; Dr. Shiv Yadav, Secretary ISST, DR. Sudipta Basu, Treasurer ISST attended the meeting.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)









.jpeg)





.jpeg)



.jpeg)




