वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील अखिल
भारतीय तेलबिया संशोधन संस्थे अंतर्गत मौजे हंडरगुळी (ता.उदगीर) घेण्यात आलेल्या करडई
पीक प्रात्यक्षिकास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक 3 फेब्रुवारी भेट दिली. त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर
बेग व लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. मोहन धुप्पे, सरपंच श्री ज्ञानेश्वर गायकवाड, करडई उत्पादक तथा प्रगतशील शेतकरी श्री
सतीश काळे, श्री कल्याण पाटील, श्री विजय आंबेकर आदी उपस्थित होते.
यावेळी माननीय कुलगुरू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि करडई
उत्पादनाचे महत्व सांगितले. शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या आंतरपीक पद्धतीचेही त्यांनी कौतुक
केले. याबरोबरच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता नियमित सुरु असलेल्या
विद्यापीठाच्या ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ
कृषि संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होवून माहिती घेण्याचा आणि शास्वत
शेतीसाठी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान आणि कृषि सल्ला अवलंबन करण्यासाठी प्रोत्साहन
दिले. भेटी दरम्यान हंडरगुळी गावातील शेतकरी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment