Tuesday, March 5, 2024

कृषि महाविद्यालय परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत पश्चिम विभागीय कृषि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कृषि महाविद्यालय परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना श्रमदानाचे उपयोग आणि महत्त्व समजावून सांगून जीवनामध्ये स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. पी. आर. झंवर, कार्यक्रमाधिकारी डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि प्रा संजय पवार यांची उपस्थिती होती. शिबिरातील स्वयंसेवकांनी पश्चिम विभागीय मेळाव्यातील प्रदर्शनामध्ये असलेल्या विविध दालन धारकांना त्यांच्या कार्यात मदत केली, याबरोबरच प्रदर्शनास भेटी देण्यासाठी शहरातून व बाहेरगाऊन आलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सर्वोतोपरीने सहकार्य केले. तीन दिवस चाललेल्या मेळाव्यातील विविध समारंभ, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहातील व्यवस्थेतेसह सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही शिबिरातील स्वयंसेवकांनी हिरीहिरीने भाग घेतला.



No comments:

Post a Comment