Wednesday, July 23, 2025

शुद्ध पैदासीतून देशी गोवंशाला शाश्वत व्यवसायाकडे घेऊन जाणे गरजेचे - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन सप्ताह समारोप उत्साहात संपन्न

शुद्ध पैदासीतून देशी गोवंशाला शाश्वत व्यवसायाकडे घेऊन जाणे गरजेचे असून शुद्ध गोवंश पैदासीतून गुणात्मक व संख्यात्मक गोमातेचा विकास शक्य होईल असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इंद्रमणी याने केले . ते कृषि महाविद्यालय, लातूर, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, एम.एस.डी. पशु आरोग्य,लातूर, देवणी गोवंश जतन व पैदासकार असोसिएशन, लातूर आणि ज्येष्ठ पशुवैद्यक संघ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जुलै 2025 रोजी आयोजीत शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन सप्ताह समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून  बोलत होते.  कार्यक्रमास माफसु चे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ अनिल भिकाने , वनामकृवीचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार , सहयोगी अधिष्ठता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.नानासाहेब सोनवणे, डॉ. अच्युत भरोसे,डॉ.भास्कर बोरगावकर, राजेशजी संन्याशी, डॉ.चंद्रशेखर दैवज्ञ व कुणाल घुंगार्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

 उद्घाटनपर भाषणात  डॉ. भिकाने म्हणाले की  स्थानिक देवणी  व लाल कंधारी गोवंश जतन व संवर्धन करणेसाठी उत्कृष्ट निवड प्रक्रिया, सेक्स सॉर्टेड सिमेन व आय व्ही  एफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून  गायीची दूध उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. पैदासकारानी गोवंशाची पैदास वळूकेंद्रित न ठेवता गायकेंद्रित करणे गरजेचे असून धोरणकर्ते, शास्त्रज्ञ व पैदासकार यांनी समन्वयातून गोवंशाचा समतोल विकास साधावा. देशी गोवंशाच्या वाढीसाठी उत्कृष्ट चारा उत्पादन,आहार व्यवस्थापन व मुक्तसंचार गोठ्याचा अवलंबं करावा.

डॉ. आसेवार यांनी देशी गोवंश जतन व संवर्धनाचे महत्त्व विशद करून मार्गदर्शन केले.   यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.ठोंबरे म्हणाले की शुद्ध पैदास,समतोल आहार, काटेकोर व्यवस्थापन आणि चांगले आरोग्य हे पशुधन गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पुढे असेही म्हणाले की दुग्ध उत्पादन, सेंद्रिय खत व शेतीसाठी ओढ शक्ती हे शुद्ध देशी गोवंशाच्या संवर्धनातून होऊ शकते. याप्रसंगी डॉ. बोरगावकर, श्री संन्याशी व डॉ.  सोनवणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले या प्रसंगी  डॉ.अनिल भिकाणे, बच्चेसाहेब देशमुख, रावसाहेब आडे यांचा सेवापुर्ती निमित्त गौरव करण्यात आला. तसेच देशी गोवंश शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. श्रीधर शिंदे, डॉ.अनंत शिंदे,डॉ. गणेश निटुरे , देवणी व लाल कंधारी गो पैदासकार  शेषराव सूर्यवंशी, देविदास नरवटे, सत्यभामा शिंदे, रज्जाक पठाण, विठ्ठल देवकते व बालासाहेब जाधव यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अच्युत भरोसे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. अनंत शिंदे व आभार कुणाल घुंगार्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्यंकट जगताप,डॉ.विजय भामरे, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. राजेश शेळके, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ.  पद्माकर वाडीकर, डॉ.सुनिता मगर, डॉ. दयानंद मोरे, डॉ. प्रभाकर आडसूळ,डॉ.नितीन तांबोळी,डॉ. अनिल कुमार कांबळे,डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. महेंद्र दुधारे, डॉ. रमेश ढवळे,डॉ. योगेश भगत,प्रा.ममता पतंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला लातूर धाराशिव नांदेड व बीड या चार जिल्ह्यातील पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.





No comments:

Post a Comment