Monday, July 1, 2024

छत्रपती संभाजीनगर येथे कृषी विज्ञान केंद्राच्‍या वतीने कृषी दिन व १०० वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्‍न


दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी मा.डॉ.इंद्र मणि, कुलगुरू,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी, श्री.दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर, श्री.रावसाहेब भागडे, महासंचालक,एमसीएआर, पुणे, श्री.विकास मीना,सीईओ,जि.प.छत्रपती संभाजीनगर, श्री.ब्रिजेश मिश्रा,आयपीएस, डाॅ.तुकाराम मोटे, विकृससं,छत्रपती संभाजीनगर, श्री.पाथ्रीकर, माजी जि.प.अध्यक्ष, श्री.बालासाहेब तौर, प्रकल्प संचालक, आत्मा, शास्त्रज्ञ, डॉ.भगवानराव कापसे, डॉ.गिरधारी वाघमारे, डॉ.सूर्यकांत पवार, श्री प्रकाश देशमुख, जिअकृअ, श्री. प्रकाश पाटील,कृषी विकास अधिकारी, श्री.सुनील कुलकर्णी, इफको, छत्रपती संभाजीनगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील ११० शेतकरी (DFI) आणि १४ महाराष्ट्र शासनाकडुन कृषि पुरस्कार प्राप्त बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला. या वेळेस कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ निर्मित पौष्टिक भाजिपाला बियाणे किट आणि कृषि उद्योजक श्री व सौ लोलगे निर्मित नैसर्गिक किट (गाडुंळ खत, गाडुंळ पाणी व फुले भाजिपाला) किट विमोचन करण्यात आले. एकुण ३६२ शेतकरी बंधू भगिनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















No comments:

Post a Comment