Friday, November 24, 2023
वनामकृवि विकसित तुरीचे वाण गोदावरी... बहरलेले शेतकरी बांधवांच्या शेतात
Sunday, November 19, 2023
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी सेवा केंद्रास माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांची भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी सेवा केंद्रास भेट दिली यावेळी
त्यांनी केंद्राच्या कृषि व ग्राम विकास विभागाच्या सदस्या बरोबर चर्चा केली. यावेळी
केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी अर्चना बहनजी और ब्रह्माकुमार तांदले भाईजी यासह
केंद्राचे इतर सदस्य उपस्थित होते.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, अहंकार, व्देष, स्वार्थ हे मानवाच्या
प्रगतीतील मुख्य अडथळे असुन व्यक्ती कितीही विव्दान असला तरी त्यांच्या मध्ये
विनय पाहिजे. आज युवकांना मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज असुन प्रजापिता ब्रम्हाकुमारी
सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा.
अल्पसंख्यांक मंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चि. अमेर सत्तार यांच्या विवाह सोहळास कुलगुरू यांची उपस्थिती व शुभेच्छा
अल्पसंख्यांक मंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा हा विवाह सोहळा दिनांक १९ नोव्हेंबर रोजी शाही उत्साहात पार पडत आहे. लग्न सोहळयास राज्यातील अनेक बडे नेत्यांनी हजेरी लावली होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी लग्न सोहळयास उपस्थित राहुन नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या.